धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झालेली असतानाच पोलीस देखील अलर्ट झालेले आहेत़ ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष असा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे़ यात स्वत: पोलीस अधीक्षक यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी ४, पोलीस निरीक्षक १८, सहायक पोलीस निरीक्षक २०, पोलीस उपनिरीक्षक ३५, पोलीस कर्मचारी ८१५, होमगार्ड २०० यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आलेली आहे़दरम्यान, शहरात हा बंदोबस्त लावण्यात आलेला असून ठिकठिकाणी त्याचे नियोजन करण्यात आले आहे़ टप्प्या-टप्प्याने हा बंदोबस्त सज्ज करण्यात आलेला आहे़ त्यांच्या मदतीला वाहतूक शाखा देखील उभी आहे़ शहरात लॉकडाउन काळात विनाकारण फिरणाऱ्यांना मज्जाव करण्यात येत असताना तरी देखील नियमांचे उल्लंघन केले जात आहेत़शहरातील विविध पोलीस ठण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ अटकेची देखील कारवाई सुरु आहे़ अशा प्रकारची कारवाई सुरु राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़
कोरोनासाठी स्वतंत्र पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:45 IST