भाटपुरा येथे झाले सत्तांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST2021-01-22T04:32:51+5:302021-01-22T04:32:51+5:30
भाटपुरा येथे ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ सत्ताधारी गटाचे सरपंच शैलेश चौधरी विरोधात जे़ टी़ पाटील ...

भाटपुरा येथे झाले सत्तांतर
भाटपुरा येथे ११ जागांसाठी २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ सत्ताधारी गटाचे सरपंच शैलेश चौधरी विरोधात जे़ टी़ पाटील यांनी पॅनल देऊन चुरस निर्माण केली़ मात्र मतदारांनी सत्ताधारी गटाला विरोध करीत पाटील यांच्या पॅनलला बहुमत दिले़. विद्यमान सरपंच चौधरी हे विजयी झालेत मात्र त्यांच्या गटाचा पराभव होऊन त्यांना फक्त ४ जागा पटकाविता आल्यात़ पाटील यांच्या गटाने ७ जागा मिळवून पुन्हा सत्ता काबीज केली़
विद्यमान सरपंच शैलेंद्र धर्मराज चौधरी ४७४ तर विरोधी योगेश साहेबराव पवार यांना ३३३ मते मिळाल्याने चौधरी १४१ मताधिक्याने विजयी झालेत़
प्रभाग ४ मध्ये विरोधी पॅनलचा नवखा तरुण रोशन सुरेश सोनवणे यांना ६७७ मते तर सत्ताधारी गटाचे शेखर हिरालाल देवरे यांना २२९ मते मिळाल्याने सोनवणे तब्बल ४४८ मताधिक्याने विजयी झाले. तसेच सेवानिवृत्त शाखा अभियंता जे़ टी़ पाटील यांच्या योगदानामुळे पुन्हा सत्ता काबीज केली़
प्रभाग १ मध्ये संजय नामदेव वाघ, शैलेंद्र धर्मराज चौधरी, बेबी गोकूळ भील, प्रभाग २ मध्ये सुशील हिरामण बैंसाणे, सुनंदा दिलीप भील, अंजनाबाई भीमराव कोळी, प्रभाग ३ मध्ये ताराचंद चांगू बंजारा, लताबाई चिंतामण बंजारा, प्रभाग ४ मध्ये रोशन सुरेश सोनवणे, ललिता श्रावण चव्हाण, सुमन बळीराम बंजारा हे निवडून आलेत़. दरम्यान, पाटील गटाच्या उमेदवारांनी निकालानंतर एकच जल्लोष केला होता.