दोंडाईचा व शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर सुविधा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:55+5:302021-09-05T04:40:55+5:30
दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वेची पीएसी समिती आली होती. त्या वेळी त्यांची दोंडाईचा येथील प्रवासी संघटना व राजकीय पदाधिकारी यांच्यासोबत ...

दोंडाईचा व शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर सुविधा वाढवा
दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वेची पीएसी समिती आली होती. त्या वेळी त्यांची दोंडाईचा येथील प्रवासी संघटना व राजकीय पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. या वेळी प्रवासी संघटनेचे खुर्शीदभाई कादीयानी, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन यांनी समस्या मांडल्या. त्यात नंदुरबार स्टेशन जवळ असल्याने या ठिकाणी अनेक रेल्वे गाड्यांना थांबा असल्याने दोंडाईचा येथे थांबा देण्यात येत नाही. परंतु नंदुरबार हा जिल्हा वेगळा असताना दरवेळी आम्हाला नंदुरबारला गाडी थांबते म्हणून दोंडाईचा किंवा शिंदखेडा येथे थांबा देण्यात येत नाही, असे सांगितले जाते. हे अन्यायकारक असून या ठिकाणी कव्हर शेडसह प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर शौचालय, पिण्याचे पाणी आदी सोयी करणयात याव्यात, अशी मागणी केली.
समितीच्या वतीने डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हे सर्व विषय प्राधान्याने घेऊन दोंडाईचा व शिंदखेडा रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, प्रवासी संघटनेचे खुर्शीदभाई कादीयानी, विजय मराठे, नगरसेवक नरेंद्र गिरासे, हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, ईश्वर धनगर, अनिल सिसोदिया, भैया धनगर, अशोक चौधरी, पंकज चौधरी, संजय चांदणे, कैलास दीक्षित, शिंदे, मोंटू वंजारी, मनोज निकम, छोटू ढोले, कल्याणसिंग राजपूत आदी उपस्थित होते.