चाचणींची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:34 IST2021-03-25T04:34:28+5:302021-03-25T04:34:28+5:30
धुळे तालुक्यातील नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. याआधीही पहिल्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गाव कोरोनामुक्त ...

चाचणींची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय
धुळे तालुक्यातील नेर हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. याआधीही पहिल्या लाटेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गाव कोरोनामुक्त झाले होते. आता पुन्हा चार रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले ११ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना घेण्यासाठी थेट आरोग्य विभाग गावात सायरन वाजवत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका पाठवून धुळे येथे अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी घेऊन गेले आहेत. त्यामुळे गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर व कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच गावातील खासगी दवाखान्यात रॅपिड टेस्ट करण्याची परवानगी द्यावी, जेणे करून नागरिकांची धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही. असे लोकमतशी बोलतांना सामाजिक कार्यकर्त डाॅ सतीश बोढरे व ग्रामपंचायत सदस्य सुनील भागवत,रावसाहेब खलाणे,जितेंद्र देवरे,राकेश अहिरे यांनी सांगितले