रोहयोत कृषी मजुरांचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:45 IST2021-09-16T04:45:02+5:302021-09-16T04:45:02+5:30
कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे ...

रोहयोत कृषी मजुरांचा समावेश करा
कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती नेहमीच संकटात असते. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतो. त्यातच कृषी मजुरी प्रचंड वाढल्यामुळे व शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व पिकांचा व कृषी मजुरांचा समावेश महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आधार मिळेल. असंघटित शेतमजुरांना ही त्यांचा रोजगार मिळेल. अशी अपेक्षा माजी सरपंच गिरीश नेरकर, यांनी व्यक्त केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवण्यास थोडीफार मदत होईल. यापूर्वी महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेत फळबागांचा समावेश करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर इतर पिकांचाही या योजनेत समावेश व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे या बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
150921\img-20210824-wa0017.jpg
फोटो