़़़ तर टळेल कांद्यावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 22:06 IST2020-08-10T22:05:49+5:302020-08-10T22:06:09+5:30
आवाहन : कृषी विभागाच्या मागदर्शक सूचनांचे पालन करा

dhule
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह परीसरात सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करीत आहेत़ शेतकऱ्यांनी कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन केल्यास गत वर्षीच्या करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळता येवु शकतो असे मार्गदर्शन कांदा पिकाचे जाणकार डॉ. श्रीधर देसले यांनी शेतकऱ्यांना केले आहे़
गेल्या वर्षी मालपूरसह सुराय, कलवाडे, अक्कलकोस, देवकानगर येथे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यावेळी देखील कृषी विभागाने कांदा पिकावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामुळे करपा, मर, आदी रोगापासून कांदा पिकाचा बचाव करण्यासाठी सुरुवाती पासुन योग्य नियोजन व कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे मार्गदर्शन केले होते़
कांदा लागवडीपुर्वी माती परीक्षण खुप गरजेचे आहे. शिंदखेडा तालुक्यातील जमिनीमध्ये पोटॅश चे प्रमाण खुप कमी आहे. यासाठी शेतकºयांनी कांदा लागवडी बरोबर दोन बॅग युरिया व तीन बॅग पोटॅश लागवडीसोबत एकरी द्यावे़ तसेच २१ दिवसांनी एक बॅग युरिया पुन्हा द्यावा. तर अमुनीनंतर गोलची फवारणी करावी़
मालपुर परिसरात गादी वाफे, सर पध्दतीने तसेच ठिंबक सिंचनाची सोय असेल तर बेडवर कांद्याची लागवड करत असतात. दोन्ही हंगामात कांदा लागवडीला प्राधान्य दिले जाते़