बळसाणे येथे पोषण महाअभियानाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:40+5:302021-09-05T04:40:40+5:30
यावेळी उपसरपंच महावीर जैन म्हणाले की, कोरोना महामारीत कोणीच घराबाहेर पडायला तयार नव्हते. अशा काळात खरे कोरोनायोद्धा म्हणून ...

बळसाणे येथे पोषण महाअभियानाचे उद्घाटन
यावेळी उपसरपंच महावीर जैन म्हणाले की, कोरोना महामारीत कोणीच घराबाहेर पडायला तयार नव्हते. अशा काळात खरे कोरोनायोद्धा म्हणून बालविकास प्रकल्प विभागाच्या ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक, जि.प. शिक्षक यांनी गावागावांत कोरोनाबाबत जनजागृती व तपासणी करण्याचे काम केले. मंदाबाई दाभाडे यांनी सांगितले की, या महाअभियानात बालकांना पोषण आहार वाटप करणे, गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी कोरोना लसीकरण शिबिर राबविणे, गरोदर मातांची तपासणी, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी विकास दाभाडे, अंगणवाडी सेविका मंदाबाई पवार, जयाबाई धनगर, सुचिताबाई गिरासे, रेखाबाई चव्हाण, संगीताबाई धनगर, सुमय्याबाई शेख, कविताबाई खांडेकर, मेघाबाई खांडेकर, राधाबाई खांडेकर व मदतनीस उपस्थित होते.