धुळे महापालिकेच्या नवीन इमारतीचे रविवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:17 IST2018-08-30T20:16:18+5:302018-08-30T20:17:29+5:30

शरद पवार उपस्थित राहणार, पूर्वतयारीला वेग

The inauguration of the new building of Dhule Municipal Corporation on Sunday | धुळे महापालिकेच्या नवीन इमारतीचे रविवारी उद्घाटन

धुळे महापालिकेच्या नवीन इमारतीचे रविवारी उद्घाटन

ठळक मुद्दे- शरद पवारांच्या रविवारी नवीन इमारतीचे उद्घाटन- मनपा नवीन इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई- स्थायी समितीत खर्चाच्या मंजूरीचा विषय सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी २ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते होणार आहे़ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुर्वतयारीला वेग देण्यात आला असून इमारतीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़ 
महापालिकेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा येत्या रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह या कार्यक्रमाला माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, पालकमंत्री दादा भूसे, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार अमरिशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी, अनिल गोटे, डी़एस़अहिरे, कुणाल पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजी दहिते, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत़ त्यानुषंगाने पूर्वतयारीचे काम सुरू असून नवीन इमारतीच्या समोरील रस्त्यावर असलेला रस्ता दुभाजक तोडून रस्ता सपाट करण्यात आला आहे़ तसेच इमारतीवर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे़ 


 

Web Title: The inauguration of the new building of Dhule Municipal Corporation on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.