पटेल सीबीएसईमध्ये पदप्रदान समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:29+5:302021-07-21T04:24:29+5:30
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना, पदप्रदान समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलन करून, ...

पटेल सीबीएसईमध्ये पदप्रदान समारंभ
२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना, पदप्रदान समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलन करून, विद्यालयाचे प्राचार्य निश्चल नायर व उपप्रचार्या अनिता थॉमस यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हा सोहळा अतिशय वेगळ्या पद्धतीने व ऑनलाइन साजरा करण्यात आला. याप्रसंगी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करून त्यांना सॅश व बॅज प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, शिस्तप्रियता, संघ भावना, जबाबदारी स्वीकारणे, कलागुणांचा विकास होण्यासाठी शाळेत त्यांनाही पदभार दिला जातो, जेणेकरून ते भविष्यात एक चांगले सुसंस्कारी, जबाबदार व नेतृत्वसंपन्न नागरिक बनतील. याच उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध पदे प्रदान करण्यात आली.
माध्यमिक विभागातून शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अनंत मराठे व विद्यार्थिनी प्रतिनिधी अचल राणा यांना पदप्रदान करण्यात आले. शिस्तप्रमुख सौहार्द गुप्ता, राधिका बोडखे, सांस्कृतिक प्रमुख भूषण बागुल, दिशा भंडारी, क्रीडा प्रमुख श्लोक शिंदे, तस्निम अन्सारी यांना पदप्रदान करण्यात आले, तसेच सफायर हाउसचे गटप्रमुख समर्थ गिरासे, रिओना शिवहारे, एमराल्ड हाउसचे अर्श गोर्ले, जान्हवी वायचाल, रुबी हाउससाठी ओम भदाणे, अनुष्का सरोदे, ॲम्बर हाउससाठी विक्रांत बोरसे, दृष्टी शहा यांना गटप्रमुख म्हणून पद देण्यात आले.
प्राथमिक विभाग विद्यार्थी प्रमुख प्रणव गोड, आरोही गंग्रानी, शिस्तप्रमुख तपन पाडवी, आर्या भोळे, सांस्कृतिक प्रमुख अर्णव पवार, कल्याणी नायर, क्रीडा प्रमुख पवन अग्रवाल, हनसिका भोपे यांना पद देण्यात आले. शिक्षकांमधून हाउस मास्टर व हाउस मिस्ट्रेस म्हणून निवड करण्यात आली. सफायरसाठी मनोज खैरणार व अंजली पाठक, एमराल्डसाठी मंगेश ठाकूर व स्वप्ना डॅनियल, रूबी हाउससाठी जितेंद्र लोहार व अनुराधा वसावे तर ॲम्बर हाउससाठी सूरज राणे व भारती सोनवणे यांना पद प्रदान करण्यात आले. चारही हाउसच्या विद्यार्थ्यांनी व प्रतिनिधी यांनी आपले कार्य निष्ठापूर्वक बजावण्याची, सत्यता, सन्मान हे शाळेचे आदर्श व उद्दिष्ट उच्च स्तरावर ठेवण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य निश्चल नायर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन राकेश साळुंखे व अनुराधा वसावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक जयवंत ठाकूर व आराधना दुबे यांनी सहकार्य केले.