बायोमायनिग प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:25 IST2019-12-18T23:25:08+5:302019-12-18T23:25:33+5:30

महापालिका : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सहा महिन्या प्रकल्प पूर्ण होणार

 Inauguration of the BioMining Project | बायोमायनिग प्रकल्पाचे उद्घाटन

Dhule

धुळे : महापालिकेच्या वरखेडी कचरा डेपोवर अनेक वषार्पासून साठलेला कचरा अखेर साफ करण्यात येणार आहे. कचऱ्याचे शास्त्रशुध्द पध्दतीने विघटन करुन त्यावर प्रक्रिया करीत कचरा डेपोची जागा मोकळी केली जाणार आहे. यासाठी मनपाच्या बायोमायनिग प्रकल्पाच्या कामाचा बुधवारी खासदास डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले़
शहरातील संकलन केलेला कचरा वरखेडी गावाजवळील महापालिकेच्या कचरा डेपोवर गोळा केला जातो. अनेक वषार्पासून कचरा एकाच ठिकाणी संकलीत होत आहे़ कचरा डेपोला सतत आग लावण्यात येत असल्याने परिसरात दुर्गधी पसरते़ त्यामुळे कचरा डेपो स्थलांतराची मागणी स्थानिक नागरिकांकडून अनेक वर्षापासून केली जात होती़ स्वच्छता अभियानातंर्गत महापालिकेतर्फे बायो मायनिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी १४ व्या वित्त आयोग योजनेतंर्गत निधीतून हा प्रकल्प सहा महिन्यात साकारण्यात येणार आहे़ या कामाचे उदघाटन खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, आयुक्त अजिज शेख, स्थायी समिती सभापती युवराज पाटील, नगरसेवक देवेंद्र सोनार, संजय भिल, स्नेहल मनोज जाधव, हिरामण गवळी, वैशाली भिकन वराडे, सुनिल बैसाणे, अमोल मासुळे, संजय पाटील, नागसेन बोरसे, हर्षकुमार रेलन, भारती माळी, चेतन मंडोरे आदी उस्थित होते.

Web Title:  Inauguration of the BioMining Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे