विविध कसोट्यांमुळे ईव्हीएम मशिनमध्ये खोटे करणे अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 11:59 AM2020-01-27T11:59:39+5:302020-01-27T12:01:22+5:30

राष्टÑीय मतदार दिन । अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांचे प्रतिपादन

 Impossible to lie in EVM machine due to various tests | विविध कसोट्यांमुळे ईव्हीएम मशिनमध्ये खोटे करणे अशक्य

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : १८ वर्षानंतरच तरूणाईच्या हातात लोकशाहीची सुत्रे येणार आहेत़ विशेषत: तरूणाईच्या हातातील मोबाईलमध्ये सारखं बिंबवलं जात की, ईव्हीएम मशिन हे खोटं आहे, चुकीचे आहे़ मात्र, ईव्हीएम मशिन हे १०० टक्के स्वच्छ, खरे आहे़ या मशिनला इतक्या कसोट्या लावल्या आहेत की, त्यामध्ये खोटं करणे या पातळीवर शक्य नाही, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी केले़
२५ रोजी येथील अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय १०वा राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, आरसीपी संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल, तहसिलदार आबा महाजन, न.पा. सीईओ अमोल बागुल, पटेल संस्थेचे सीईओ डॉ़उमेश शर्मा, नायब तहसिलदार गणेश आढारी, सुदाम चौरे, सहाय्यक बीडीओ सुवर्णा पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, प्राचार्य दिनेश राणा, उपप्राचार्या अनिता थॉमस, पी़झेड़ रणदिवे, केक़ेख़ैरणार, ढोले, डॉ़महेंद्र पाटील आदी उपस्थित होते़
उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे म्हणाले, भारतीय नागरीक चित्रपट पाहण्यासाठी ३ तास देतात, किक्रेट पाहण्यासाठी दिवसभर वेळ देतात अन् राजकारणाची चर्चा करतांना तर आपण कधीही दमत नाही़ मात्र मतदान करण्यासाठी आपण साधे १० मिनीटे सुध्दा देवू शकत नाही, ही एक शोकांतिका आहे़ तहसिलदार आबा महाजन म्हणाले, लोकशाही बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे़ जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान या तालुक्यात होत असून ही गौरवास्पद बाब आहे़
सुरूवातीला शहरातील सर्व शाळांनी जनजागृती रॅली काढली़ कार्यक्रमस्थळी मतदान जागृतीसाठी रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली़ सांगवी शाळेतील मुलींनी आदिवासी नृत्य सादर करून दाद मिळविली़ जि़प़शिक्षकांच्या कला पथकाने देखील मतदान जनजागृती नाटीका सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी पी़झेड़ रणदिवे यांनी केले़

Web Title:  Impossible to lie in EVM machine due to various tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे