शेतकरी सन्मान निधी योजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:52+5:302021-09-04T04:42:52+5:30
धुळे : राज्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आम आदमी पार्टीने ...

शेतकरी सन्मान निधी योजना राबवा
धुळे : राज्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना राबविण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आम आदमी पार्टीने केली आहे. जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याबाबतचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात महसूल व कृषी विभागातील आपसातील संघर्षामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. महसूल खात्यात पंतप्रधान सन्मान निधी योजना राबविण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. मात्र महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना काम करण्यास नकार देत आहेत. कृषी विभागात जाऊन शेतकऱ्यांनी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा असे सांगण्यात येत आहे. दोन विभागांच्या संघर्षामुळे शेतकऱ्यांची फरपट होत आहे. शेतकऱ्यांनी न्याय हक्कांसाठी कोणाकडे जावे असा प्रश्न उपस्थित होतो? त्यामुळे यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ईश्वर पाटील, पीयूष शिंदे, दत्तात्रय पाटील, राजेंद्र देवरे, सतीश शिंदे, धुडकू सोनवणे, पिंटू पगारे, सखाराम ठाकरे यांच्या स्वाक्षरी आहेत.