राज्यात इको फ्रेंडली होळी अभियान राबवा, निसर्ग समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:08 IST2021-03-04T05:08:05+5:302021-03-04T05:08:05+5:30
धुळे : राज्यभर इको फ्रेंडली होळी अभियान राबविण्यात यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निसर्ग ...

राज्यात इको फ्रेंडली होळी अभियान राबवा, निसर्ग समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
धुळे : राज्यभर इको फ्रेंडली होळी अभियान राबविण्यात यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निसर्ग मित्र समितीतर्फे देण्यात आले.
होळीला गावोगावी प्रचंड वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यापेक्षा जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी परिसरात स्वच्छता अभियान राबवून जमा झालेल्या कचऱ्याची होळी करण्यात यावी. तसेच धुलिवंदनाला होणारी पाण्याची नासाडी टाळावी. रसायनयुक्त रंगामुळे त्वचेचे आजार होतात तसेच डोळ्यांना इजा होते. त्यामुळे धुलिवंदनासाठी रसायनयुक्त रंगाचा वापर करू नये, पाण्याची बचत करावी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी राज्यात शासनाने पर्यावरण पूरक होळी अभियान राबवावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निसर्गमित्र समितीतर्फे उपजिल्हाधिकारी गायकवाड, वनविभागी़य अधिकारी भोसले व सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालिका रेवती कुलकर्णी यांच्या हस्ते "एक गाव एक होळी" पर्यावरण पूरक असे इको फ्रेंडली होळी अभियान पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, संतोषराव पाटील, विश्वासराव पगार, प्रभाकर सूर्यवंशी, विजय वाघ, प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, वैभव पाटील, कांतिलाल देवरे, भरत सैंदाणे, हर्षल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.