दामिनी पथकाची वाढलेली दादागिरी त्वरित थांबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:31 IST2019-08-26T22:29:11+5:302019-08-26T22:31:06+5:30
मागणी : प्रगतीशील समाजवादी पार्टीतर्फे निवेदन

दामिनी पथकाची वाढलेली दादागिरी त्वरित थांबवावी
धुळे : दामिनी पथकाच्यावतीने सध्या महाविद्यालयातील तरूणाईच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात येत आहे. या पथकाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईची चौकशी करावी. हे पथक बरखास्त करून नवीन पथक स्थापन करावे, अशी मागणी प्रगतीशील समाजवादी पार्टीच्यावतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाडीभोकर रोडवरील एका हॉटेलमध्ये महाविद्यालयीन तरूण-तरूणी गप्पा करीत असतांना पथकाने त्याठिकाणी प्रवेश करून त्यांना बाहेर काढीत काही मुलांना शिवीगाळ केली. पथकाचा लहान मुलांवर दहशत निर्माण करण्याचा प्रकार वाढत आहे. हे सर्व प्रकार त्वरित बंद व्हावेत अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाला निवेदन देतेवेळी प्रगतीशील समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष गोरख शर्मा, शे.हबीब, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा, मनोज पाटील, गौतम जाधव, वसिम शेख. युसूफखान, आदी उपस्थित होते.