शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

अवैध गौणखनिजाचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:04 IST

जेसीबीसह साडेदहा लाखाचा साठा

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : तालुक्यातील पिंप्री गावशिवारात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अचानक भेट देऊन अवैधरित्या मुरूम व गौण खनिजाचा सुमारे ४० ब्रास साठा  पकडला. जेसीबीसह सुमारे साडेदहा  लाख रुपयांचा हा साठा आहे. रात्र झाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी पुन्हा सकाळी येथे दाखल झाले. त्यांच्यासमक्ष अवैध गौणखनिज साठ्याचा पंचनामा करण्यात आला.३ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल  रेखावार, शिंदखेडा तहसीलदार सुदाम महाजन, चिमठाणे महसुल मंडळाधिकारी एस.बी मसलकर, चिमठाणे तलाठी भीमराव बाविस्कर, अमराळे तलाठी नवनीत पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ए.एन. पाटील, दोंडाईचा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता हेमंत गोसावी आदींना पिंपरी गाव शहरातील गट क्रमांक ४३/३ वरील ४० आर क्षेत्रात अवैधरित्या मुरूम व गौण खनिजाचा साठा केल्याचे आढळून आले.  पंचनाम्यात पिवळ्या रंगाचे एक विना क्रमांकाचे जेसीबी मशीन आढळून आले. मुरूम या गौणखनिजाचे अवैद्यरित्या उत्खनन व वाहतूक व साठवणूक केल्याप्रकरणी शेतमालक किरण विठ्ठल नगराळे रा.चिमठाणे यांना एकूण १० लाख ३१ हजार ८६५ रुपये दंडाची नोटीस तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.  तसेच मंडळ अधिकारी मसळकर यांना पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आल्याने अवैध गौणखनिज वाहतूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले  आहे. अवैध वाळू उपसा सुरुचदरम्यान, परसामळ चिरणे, कदाने, अलाने, दरखेडा, महाळपूर, बाभुळदे, दलवाडे, आमराळे शिवारात व बुराई नदीत अद्याप कारवाई झालेली नसल्याने तेथे अजूनही राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरु आहे. जिल्हाधिकाºयांनी नदीत पडलेल्या खड्ड्याची पाहणी ड्रोनच्या सहाय्याने करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे