बेकायदेशीर नियुक्ती, मनपाला बजावली हायकाेर्टानेे नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:21 IST2021-07-24T04:21:38+5:302021-07-24T04:21:38+5:30
धुळे : महानगरपालिकेत बेकायदेशीर नियुक्त्या, पदोन्नती करून सर्व लाभ देण्यात आले तर काहींना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. अन्याय झाल्याने ...

बेकायदेशीर नियुक्ती, मनपाला बजावली हायकाेर्टानेे नोटीस
धुळे : महानगरपालिकेत बेकायदेशीर नियुक्त्या, पदोन्नती करून सर्व लाभ देण्यात आले तर काहींना लाभापासून वंचित ठेवण्यात आले. अन्याय झाल्याने महापालिकेचे कर्मचारी शिरीष जाधव यांनी बेकायदेशीर नियुक्तीप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यावर कामकाज होऊन २ ऑगस्ट २०२१पर्यंत महापालिकेने खुलासा सादर करावा, अशी नाेटीस खंडपीठाने महापालिकेला बजावली आहे.
महापालिकेत बेकायदेशीर पदस्थापना, पदोन्नती, नियुक्त्या तसेच समायोजन करण्यात आले. यामुळे काही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याने मनपा कर्मचारी शिरीष जाधव यांनी मनपा आयुक्तांकडे वेळोवळी निवेदन देऊनही दखल घेतली नाही. त्यानंतर जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात मनपातील बेकायदेशीर पदोन्नती, नियुक्त्या तसेच बेकायदेशीर कामांबाबत चौकशी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर १९ जुलै रोजी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. एन. लोढा यांच्यासमोर कामकाज झाले. याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून खंडपीठाने धुळे मनपाला बेकायदेशीर नियुक्त्यांबाबत २ ऑगस्ट २०२१पर्यंत खुलासा मागितला आहे.