स्पर्धा करायची असेल तर माझ्या विकास कामांशी करा - आमदार जयकुमार रावल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:30+5:302021-09-02T05:17:30+5:30
बुधवारी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन शेडच्या कामासाठी पायाभरणी करण्यात आली यावेळी शहाड्याचे आमदार राजेश पाडवी ...

स्पर्धा करायची असेल तर माझ्या विकास कामांशी करा - आमदार जयकुमार रावल
बुधवारी दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नवीन शेडच्या कामासाठी पायाभरणी करण्यात आली यावेळी शहाड्याचे आमदार राजेश पाडवी , सभापती नारायण पाटील, उपसभापती अनिल गायकवाड, जि प उपाध्यक्ष कुसुमबाई निकम, संचालक, जनाबाई पाटील, प स सभापती वैशाली सोनवणे, प स उपसभापती नारायण सिंग गिरासे, रविंद्र पाटील, बांधकाम सभापती निखिल जाधव, सखाराम पाटील, कामराज निकम , पंकज कदम, भाजप शहराध्यक्ष, प्रवीण महाजन, साहेबराव पेंढारकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर कवाड, वाल्मिक पाटील, हमाल मापडी अध्यक्ष पंडित पाटील, रमेश कोळी, विरेंद्र गिरासे, संग्राम पाटील, सचिव पंडित पाटील, उपसचिव विजय पाटील, भाजप महिला आघाडी च्या माधुरी सिसोदे, सुनंदा नारायण पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी बोलताना आ रावल म्हणाले की, 5 वर्षांपूर्वी दोंडाईचा नगरपालिका आणि बाजार समितीचीही सत्ता माझ्याकडे दिल्यानंतर 5 वर्षात बाजार समितीत व्यापारी बांधवांनी सतत मागणी केलेल्या शेड साठी बाजार समितीने स्वनिधीतुन 2 गोडाऊन 46 लाखातून, मोठे शेड 1 कोटी 53 लाख, शिंदखेडा येथे 1 कोटी 7 लाखातून शॉपिंग कॉम्पलेक्स, पुन्हा 1 कोटी 15 लाखातून शॉपीगकम ऑफिस, हाळ 3 लाख 44 हजार निधी, स्वच्छता गृह 1 लाख 86 हजार, 80 लाखातून पुन्हा शेड, स्वतःचा पेट्रोलपंप, यासह व्यापाऱ्यांना अडचण होत असल्याने पुन्हा एकदा 58 लाखाच्या निधीतून नवीन शेड उभारण्यात येत असून त्याची पायाभरणी आताच झाली आहे. दोंडाईचा येथे पालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे मी केली आहेत.. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा राजपथ, अमरावती आणि भोगावती नदीचे सुशोभीकरण, प्रशस्त अशी पालिकेची इमारत, विविध कॉलन्यात ओपनस्पेसचे सुशोभीकरण, कॉंक्रीटचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, अश्या कामांनी दोंडाईचा शहर फुलून दिसते आहे.
बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी बाजार समितीच्या माध्यमातून झालेल्या कामाचा आढावा दिला तर सूत्रसंचालन डी एस गिरासे यांनी केले.
Attachments area