या निवेदनात म्हटले आहे की, गावातील नूतन कॉलनी व महादेववाडीत वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक अंधारात पडण्याचे प्रसंग घडतात. वारंवार होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. नियमितपणे बिल वेळेवर भरून देखील हा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही समस्या वीज वितरण कंपनीने आठ दिवसात निकाली काढली नाही, तर कापडणे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, महेश बडगुजर, संदीप माळी, मनोज शिंपी, श्याम बडगुजर, पूनम माळी, संजय माळी, राजेंद्र माळी, सहादू माळी, बापू उत्तम माळी, सुरेश माळी, धर्मा माळी, प्रकाश पंडित माळी, शिवराम चौधरी, नानाभाऊ माळी, रमेश माळी, कलाबाई चौधरी, प्रतिभा माळी, शिवाजी माळी, भूषण माळी, भागवत माळी, चुडामन माळी, शरद माळी, सरलाबाई माळी, हिराबाई माळी, जिजाबाई माळी, आशाबाई माळी, प्रफुल्ल माळी आदींच्या सह्या आहेत.
(चौकट)
गेल्या अनेक दिवसांपासून गावात काही भागामध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याबाबत स्थानिक सहायक अभियंता यांना निवेदने देण्यात आली. मात्र या समस्या अजूनही निकाली निघत नाहीत. ग्रामस्थांनी निवेदन दिले तेव्हा महिलांनी अंजली हिंगमिरे यांच्याकडे संताप व्यक्त केला. अधिकारी ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.