प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यास ठेकेदारावर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:05+5:302021-07-22T04:23:05+5:30
धुळे महानगरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यूने डोके वर केलेले दिसून येत आहे. त्यामुळे प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळून ...

प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यास ठेकेदारावर कारवाई करणार
धुळे महानगरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यूने डोके वर केलेले दिसून येत आहे. त्यामुळे प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक प्रभागाची धुरळणी व फवारणी करण्यासाठी मनपाने ठेकेदार नियुक्त केला आहे. ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम करण्याची अपेक्षा आहे; मात्र असेही न झाल्यास या ठेकेदारावर कारवाई करणार, असा इशारा प्रभाग सातचे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी दिला आहे. शहरातील साक्रीरोडवरील प्रभाग सातमध्ये काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका मलेरिया विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील धुरळणी व फवारणीचा ठेका मनपाने संजय गायकवाड यांना दिला आहे. हर्षकुमार रेलन यांनी बुधवारी प्रभागात संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकारी विलास चौधरी यांना बोलावून प्रभागातील समस्या व योग्य पद्धतीने फवारणी होत नसल्याची तक्रार केली. प्रभागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येऊ नये, तसेच कामात कसुर करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मागणी करणार, असा इशारा दिला आहे.