सत्यशोधक सभेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:36 IST2019-11-30T23:35:47+5:302019-11-30T23:36:23+5:30
महात्मा फुले स्मृतीदिनी उपक्रम : विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Dhule
शिरपूर : सत्यशोधक शिक्षक सभेतर्फे महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार वितरण व विविध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला़
२८ रोजी येथील शंकुतला लॉन्सच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला़ तालुकास्तरीय सत्यशोधक प्रबोधन स्पर्धा परीक्षेचे बक्षिस वितरण, आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण भारत सरकार स्काऊट-गाईडच्या जिल्हा आयुक्त आशा विजयराव रंधे यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे सेक्रेटरी सिद्धार्थ जगदेव, उपाध्यक्ष दत्ता थोरात, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, एस.ए. पाटील, सुभाष कुलकर्णी, सारिका रंधे, डॉ.सी.एच. निकुंभे, हाजी फिरोज काझी, रत्नदीप सिसोदिया, संतोष माळी आदी उपस्थित होते़ २८ नोव्हेंबर हाच शिक्षक दिन या विषयावर पुणे येथील किशोर जाधव यांनी मार्गदर्शन केले़ विचार वेध निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राजक्ता अनिल पाटील, द्वितीय अक्षदा जितेंद्र पाटील, तृतीय किंजल विठ्ठल लोहार तर उत्तेजनार्थ जयेश अशोक चौधरी, भूमिका हंसराज पाटील, प्राची सुरेंद्र पाटील, चित्रकला परीक्षेत प्रथम भुमिका संतोष पाटील, द्वितीय हिताक्षी बाबुराव गिरासे, तृतीय मीना दिपक मोरे, उत्तेजनार्थ उर्वशी भुपेश बारी, मंगेश भिकन पाटील, चैताली मनोज पवार या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. चित्रकला स्पर्धेचे परिक्षक म्हणून मयुर मनोजसिंग परदेशी, कन्हैयालाल साळुंखे यांनी काम पाहिले. आदर्शशिक्षक गौरव पुरस्कार मंगला देवेसिंग पावरा (रंधे कन्या शाळा, शिरपूर), सिद्धार्थ बाजीराव पवार (आर.सी. पटेल विद्यालय टेकवाडे), वसंत साहेबराव मराठे (नुतन विद्यालय भटाणे), श्रीराम देवराम सोनवणे (न.पा. शाळा क्र.७ शिरपुर), डॉ.फारुख शेख ईस्माइल (मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू माध्यमिक विद्यालय शिरपूर) यांचा सत्कार झाला. सुत्रसंचालन सुनिल बैसाणे, प्रास्ताविक ज्वाला मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.नाजीर पठाण, योगेश पवार, प्रा.प्रज्ञावंत बिºहाडे, राहुल थोरात, प्रा.अरुण पवार, मनोज बिºहाडे, प्रमोद परदेशी, सुभाष भिल, प्रा.रंजना सावळे, शितल मोरे यांनी परिश्रम घेतले़