धुळ्यातील आयस्कॉन कार्यकारिणी सदस्यांचा झाला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:36 IST2019-11-22T11:36:29+5:302019-11-22T11:36:48+5:30
उपक्रम : कौसल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघाने केले कार्यक्रमाचे आयोजन

धुळ्यातील आयस्कॉन कार्यकारिणी सदस्यांचा झाला सत्कार
आॅनलाइन लोकमत
धुळे : अखिल भारतीय (आयस्कॉम) ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीवर निवडून आलेल्या ज्येष्ठांचा नुकताच सत्कार करण्यात आला. कौसल्या महिला ज्येष्ठ नागरिक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव मराठे होते. यावेळी अ.भा. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य व्ही.के. भदाणे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ विकास समितीचे अध्यक्ष पी.एम.पाटोळे, नंदलाल अग्रवाल, डॉ. सुलभा कुंवर, प्रा.डॉ. उषा साळुंके, आबा पाटकरी, गुलाबराव पाटील, वासुदेव भदाणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नंदलाल अग्रवाल यांनी आयस्कॉनचे कार्य, भूमिका, प्रशासकीय समिती याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सचिव उषा नांद्रे यांनी तर आभार शकुंतला पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उल्का मोरे, मालती मराठे, लिला खैरनार, शोभा चौधरी, हेमलता घुगे, भारती पाटील, अर्चना अग्रवाल, चंद्रकला पाटील, मंगला वाघ, शोभा नाईक, पुष्पा पाटकरी, यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.