शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमधल्या प्रेयसीसाठी जवानाने पत्नीला दिले विषारी इंजेक्शन; मृत्यू होईपर्यंत शेजारीच होता बसून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:04 IST

अनैतिक संबंधातून धुळ्यात विवाहितेचा इंजेक्शन देवून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धुळे : शहरातील वलवाडी शिवारातील रहिवासी व भारतीय सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागुल याने आपले दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध पत्नीला माहिती पडले म्हणून पत्नी पूजा (वय ३८) हिचा पेस्टिसाईडचे इंजेक्शन देऊन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी पती कपिलसोबत आई, बहीण आणि प्रेयसी या चार जणांना अटक करण्यात आली आहे.

भारतीय सैन्यात क्लार्क पदावर कार्यरत कपिल बाळू बागूल (वय ४३) याचे विवाह २०१० मध्ये धडगाव जि.जळगाव येथील पूजा हिच्याशी झाला.लग्नानंतर त्याला ९ वर्षाची मुलगी आणि सात वर्षाचा मुलगा आहे. कपिलचे शिक्षण धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयात झाले आहे. कपिलचे जयहिंद महाविद्यालयात असताना एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. या तरुणीचे लग्न २००७ ला एका इसमाशी झाले. तिला देखील १७ आणि १३ वर्षाच्या दोन मुली आहेत. तिचा घटस्फोट अंतिम टप्यात आहे. काही वर्षी पूर्वी ती आणि कपिल पुन्हा भेटले आणि ते लॉजमध्ये देखील भेटू लागले.

कपिलचे प्रेम प्रकरण पुजाला माहिती पडले. पत्नी पुजाचा काटा काढण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार कपिलने गुरुवारी सायंकाळी पुजाला पेस्टिसाईडचे इंजेक्शन दिले. इंजेक्शनमुळे पुजाचा मृत्यू झाला. तिला श्री गणेश हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी पुजाला सिव्हील हॉस्पीटलमध्ये न्यायला सांगितले. मात्र कपिलने इतरांच्या मदतीने तिचा अंत्यविधीची तयारी सुरु केली. दरम्यान, पुजाच्या भाऊ भूषण शिवाजी महाजन (वय ३५) रा. भडगाव याला कपिलने मोबाईलवरुन सांगितले की, पुजाचा मृत्यू झाला आहे. तू लगेच निघ. हे ऐकल्यावर भूषण हा आपल्या नातेवाईकांसोबत तातडीने धुळ्यात दाखल झाला. दरम्यानच्या काळात याबाबत देवपूर पश्चिम पोलिस स्टेशनला ही माहिती कळाली. तातडीने घटना स्थळी येऊन पोलिसांनी पूजाचा मृतदेहाचे पोस्टमार्टमसाठी पाठविला.

कपिलने पुजाला खाली पाडून बळजबरीने इंजेक्शन दिले. कपिल आणि संबंधित लोकांनी तिला चक्क पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिले आणि मारून टाकले आहे. पूजाचा हात आणि तोंड या इंजेक्शन मुले काळे निळे पडले होते.

पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनला यासंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. दरम्या पोलिसांनी पुजाचा पती कपिल बागुल, सासू विजया बाळू बागूल, नणंद रंजना धनेश माळी रा. छत्रपती संभाजीनगर आणि प्रेयसीला अटक केली आहे.

पूजाच्या मरणाची दीड तास वाट पाहिली

कपिलने पूजाला पेस्टिसाईडचे इंजेक्शन दिला. तेव्हा तिचा तोंडातून फेस यायला लागला. पूजाचा मृत्यू दीड तासाने झाला. तो पर्यंत कपिल तिच्याकडे पाहत बसला होता.

कपिल हा बी. ए. आहे. तर मयत पूजा बीएससी बी.एड. आहे. तर प्रेयसी बीएससी एमबीए आहे.

कपिल हा नेहमी पूजाला मारहाण करायचा त्रास द्यायचा. यासंदर्भात पूजाने आपल्या भावांसोबत जाऊन जळगाव येथील महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र नंतर बहिणीचे लग्न तुटू नये यासाठी ही तक्रार मागे घेतली होती, असे भूषण महाजन याने 'लोकमत'ला सांगितले. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस