लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोडवरील पवन नगरात अचानक गोस्वामी कुटुंबियांच्या घरात गॅसला गळती लागली़ घटना लक्षात येताच ती गळती थांबविण्यात आली़ यात पती-पत्नीला किरकोळ दुखापत झाली़ सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ जखमी कुटुंबियांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ धुळे शहरातील ४० गांव रोडवरील पवन नगर परिसरात राहणारे प्रल्हाद गोस्वामी हे राहत असलेले घरात अनिता गोस्वामी या स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला गळती लागली़ ती थांबवित असताना अनिता गोस्वामी व प्रल्हाद गोस्वामी हे किरकोळ जखमी झाले़ त्या दोघांना तात्काळ धुळे येथील चक्करबर्डी परिसरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृति स्थिर आहे़
गॅस गळती झाल्यामुळे पती-पत्नीला पोहचली इजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 13:11 IST
पवन नगरातील घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
गॅस गळती झाल्यामुळे पती-पत्नीला पोहचली इजा
ठळक मुद्देपवन नगरात गॅसला गळतीगोस्वामी कुटुंब किरकोळ जखमीसुदैवाने मोठी हानी टळली