चक्करबर्डी परिसरात कु-हाडीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:25 IST2018-12-07T21:24:37+5:302018-12-07T21:25:15+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याने राग

चक्करबर्डी परिसरात कु-हाडीने वार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : निवडणुकीच्या प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याचा राग येऊन तिघानी एकास कुºहाडीने मारहाण केल्याची घटना चक्करबर्डी भागात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता घडली. शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी ईश्वर हिराला वेताळ (३९, रा. चक्करबर्डी) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, प्रचारासाठी सोबत फिरत नसल्याचा रागयेवून तिघांनी संदीप चौगुले यांच्या घरात घुसले. यात संशयितांनी पती-पत्नीस मारहाण केली. तसेच अनिल तागरकर याने त्याच्या हातातील कुºहाडीने चौगुले यांच्या डोक्यावर वार केला. तसेच ज्योती चौगुले यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अनिल बापू तागरकर, राहूल वेताळ, दीपक वेताळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकरे करीत आहे. दर दुस-या गटातर्फे दीपक किसन वेताळ (३३, रा. चक्करबर्डी) याने परस्परविरोधी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, संशयित हे छोटू विठेकर यांना धमक्या देतात. त्यांना समजविण्यास गेले असता, संशयितांनी फिर्यादीची आई, आत्या, मामेभाऊ यांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. लखन चौगुले याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अरूण पांडुरंग लष्कर, लखन चौगुले, ईश्वर वेताळ यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास बी.यू.मोरे करीत आहे.