दीड लाखाचा गुटखा जप्त

By Admin | Updated: February 10, 2017 00:36 IST2017-02-10T00:36:11+5:302017-02-10T00:36:11+5:30

मद्यसाठय़ासह एक जण ताब्यात

Hundreds of Gakhka seized in Lakhana | दीड लाखाचा गुटखा जप्त

दीड लाखाचा गुटखा जप्त

साक्री : तालुक्यात गुटखा, सुगंधी तंबाखू तसेच देशी-विदेशी मद्याचा साठा करणा:यांवर जणू संक्रांत कोसळली. तालुक्यातील धमनार येथे 17 हजारांचा देशी मद्याचा साठा, तर कासारे येथून दीड लाखाचा गुटख्याचा साठा  जप्त करण्यात आला.
साक्री पोलिसांनी शुक्रवारी तालुक्यातील कासारे येथे          एका गोदामावर छापा मारून       दीड लाख रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त  केला.
गोदामात पोत्यांमध्ये गुटख्याचा साठा करून ठेवण्यात आला होता.
पोलिसांनी अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे. तालुक्यातील धमनार येथे हुकूमचंद पगारे हा ग्रा.पं.जवळील दुकानातून देशी-विदेशी मद्य विक्री करत असल्याची माहिती मिळाली.  गुरुवारी संध्याकाळी त्याच्या घरावर छापा मारण्यात आला. तेथून 17 हजार रुपये किमतीचा देशी-विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Hundreds of Gakhka seized in Lakhana