हुंबर्डे येथे तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्या गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 22:34 IST2020-01-16T22:33:51+5:302020-01-16T22:34:10+5:30
शिकाऱ्याचीच झाली शिकार : गावात पसरले भितीचे वातावरण

हुंबर्डे येथे तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्या गतप्राण
शिंदखेडा : हुंबर्डे (ता.शिंदखेडा) येथे तापी नदीच्या काठावर बुधवारी रात्री बिबट्या शेळीची शिकार करण्यासाठी गोठ्यात गेला असता गोठ्याला तारेचे कुंपण असल्याने त्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ हा प्रकार गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. वनविभागाने हुंबर्डे येथील ७० वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला ताब्यात घेतले आहे.
हुंबर्डे येथे शेळ्यांची मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी शिकार करीत असल्याने वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हौदस घालत आसल्याने हुंबर्डे येथील शेतकरी व शेळ्याचा गोठा मालक कायसिंग रायसिंग भिल (वय ७०) यांनी वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर शेळ्याची शिकार करीत आसल्याने शेळ्यांच्या गोठ्याला तारेचे कुंपण केले होते. बुधवारी रात्री शेळ्याची शिकार करण्यासाठी बिबट्या आला असता त्याने गोठ्यात उडी मारुन आत प्रवेश केला व एका शेळीला मारुन तिला घेऊन बाहेर पडत असतांना तारेच्या कुंपणमध्ये अडकून मुत्यू झाला. गुरुवारी सकाळी हुंबर्डे ग्रामस्थांनी वनरक्षक पी. एस. पाटील यांना मोबाईलवरुन माहिती दिल्यावरुन शिरपूरचे सहाय्यक वन संरक्षक अमितराज जाधव, शिंदखेडा वनक्षेत्रपाल किरण माने, वनपाल डी बी पाटील, वनपाल गुजर, वनरक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळांचा पंचनामा केला़
त्यात बिबट्या हा तीन ते चार वर्षांचा असुन त्यांची लांबी दोन मीटर दोन सेंटीमीटर असून उंची सव्वा मीटर एवढी असून बिबट्याने अर्धवट खाल्लेली शेळीही शिंदखेडा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आली होती. व कार्यालयाच्या आवारातच बिबट्याचे शवविच्छेदन पशुधन सहाय्यक आयुक्त डॉ एस. जी. सोनवणे, सहाय्यक आयुक्त डॉ हितेंद्र पवार, वनउपचारक ए. जी. बुवा व परिचर जितेंद्र गिरासे यांनी केले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शिंदखेडा येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात बिबट्याला लाकडाने जाळण्यात आले.