अभ्यासक्रमात मानवी मूल्यांचा विचार होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:08+5:302021-08-23T04:38:08+5:30
जयहिंद शैक्षणिक संस्था, धुळे संचालित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, इंग्रजी विभाग व ऑल इंडिया ...

अभ्यासक्रमात मानवी मूल्यांचा विचार होणे आवश्यक
जयहिंद शैक्षणिक संस्था, धुळे संचालित झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालय, अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्ष, इंग्रजी विभाग व ऑल इंडिया इंग्लिश टीचर असोसिएशन ऑफ इंडिया व खान्देश चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहित्याच्या माध्यमातून मानवी मूल्यांची रुजवणूक’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन मेधा पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके होते. यावेळी व्हा. चेअरमन प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, प्रा.सुधीर पाटील, स्कूल कमिटीचे चेअरमन नानासो. प्रा.चंद्रशेखर पाटील, संचालिका ताईसो. प्रा.डॉ. नीलिमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. परिषदेत १०० पेक्षा अधिक प्राध्यापकांनी व संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधन पेपर सादर केले.
मेधा पाटकर म्हणाल्या की, समानता हे मूल्य विद्यार्थी, दलित, आदिवासी, महिला, शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक या सर्वांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महात्मा गांधी यांचे कार्य आणि मानवी कल्याणासाठी कार्य केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा विचार मानवी मूल्यांची रुजवणूक करताना होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील घटना, मानवी कल्याणासाठी झटणाऱ्या विविध चळवळी, लोकशाही या सर्वांचा विचार होणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मानवी मूल्यांची रुजवणूक झाली तर मानवी कल्याण होण्यास साह्यभूत ठरते.
डॉ.अरुण साळुंके म्हणाले की, शाश्वत विकासासाठी मानवी मूल्यांची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी विचार रुजवले जातात. दुसऱ्याकरिता त्याग करणे, आपल्या मालकीच्या संपत्तीमधून दुसऱ्याला काहीतर देणे हे एक माठे मानवी मूल्य आहे. मानवी मूल्यांमुळेच माणूस म्हणून आपल्या व इतरांच्या जीवनाच्या कल्याणाचा विचार करणे शक्य होते.
डॉ.जयदीप सारंगी, डॉ.सोनिया सिंग, (ग्वालियर, म.प्र.) यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षा डॉ. मुक्ता महाजन (चेअरमन, इंग्रजी अभ्यास मंडळ, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव) म्हणाल्या की, सध्याच्या व्यावसायिक हिंसेच्या वातावरणात मानवी मूल्यांची खूप गरज आहे. कुटुंबातून मूल्य शिक्षण देणे. साहित्याचे वाचन केल्यास मूल्य शिक्षण घेता येते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एच. पवार यांनी केले. प सूत्रसंचालन प उपप्राचार्या डॉ. वर्षा पाटील यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.व्ही.एस. पवार, उपप्राचार्य डॉ.डी.के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन पेपर सादरीकरणासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. दीपक देवरे, डॉ. संतोषकुमार पाटील, डॉ. हेमंतकुमार पाटील, डॉ. विठ्ठल काळे, डॉ. अभिजित भांडवलकर, डॉ. सरबजीत चिमा, डॉ.विजय सैंदाणे, डॉ. सुषमा सबनीस, डॉ.कल्याण कोकणे, डॉ.रॉय यांनी कार्य केले.