सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:41 IST2021-08-14T04:41:26+5:302021-08-14T04:41:26+5:30
धुळे : कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर झाला. अकरावी प्रवेशासाठी सीईटी होईल ...

सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश होणार कसे? मनासारखे कॉलेज मिळविण्यासाठी कसरत !
धुळे : कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा न झाल्याने, अंतर्गत मूल्यमापनावर आधारित निकाल जाहीर झाला. अकरावी प्रवेशासाठी सीईटी होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सीईटी घेण्यासंदर्भात काढलेली अधिसूचना रद्द केली आहे. सीईटी रद्द झाल्याने, अकरावीचे प्रवेश कसे होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर निर्माण झालेला आहे. मनासारखे प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगलीच कसरत करावी लागेल.
जिल्ह्यात दहावीसाठी २८ हजार ५६५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ९९.९८ टक्के आहे. उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जास्त व महाविद्यालयांमध्ये जागा कमी अशी स्थिती असल्याने, प्रवेशाचा पेच निर्माण झालेला आहे.
महाविद्यालयांचा कटऑफ वाढणार
अकरावीला प्रवेश घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे असतो. धुळे शहरात मोजकी दोन-तीन नावाजलेली कनिष्ठ महाविद्यालये आहेत, त्याठिकाणीच प्रवेश मिळावा याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. विज्ञान शाखेलाच मेरिटनुसार प्रवेश मिळतो. मात्र यावर्षी उत्तीर्णांचे प्रमाण जास्त असल्याने,महाविद्यालयांचा कटऑफ वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी निकाल चांगला लागला असून गुणही चांगले मिळाले आहे. सीईटीनुसार प्रवेश म्हणून ती देखील तयारी केली होती. परंतु सीईटी रद्द झाल्याने, आता प्रवेश कसा मिळणार याची चिंता आहे.
- श्रीरंग जोशी, विद्यार्थी.
भविष्यात अभियंता व्हायचे असल्याने, विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. मात्र उत्तीर्णांची संख्या जास्त असल्याने, मनासारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिंता आहे.
- शुभम झोपे, विद्यार्थी