अंतर्गत मूल्यमापनाचे फायदे व तोेटे निकालाच्या माध्यमातून समोर आले आहेत. साधारण विद्यार्थीही चांगल्या गुणांनी पास झाल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थी म्हणतात....
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले गुण अपेक्षित आहेत. परंतु परीक्षा झाली असती तर आणखी काही गुण वाढले असते असा माझा विश्वास आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाचा फायदा व काहींना तोटादेखील झाला आहे. मला दोन विषयात कमी गुण मिळालेले आहेत. परीक्षा झाली असती तर नक्कीच जास्त गुण मिळवले असते.
-एक विद्यार्थी..
निकालावर नाराज असलेले पालक म्हणतात
कोरोनाकाळ असल्यामुळे शाळा बंद होत्या, परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत चांगली झाली. परंतु लेखी परीक्षेपेक्षा अंतर्गत मूल्यमापनात पाल्याला कमी गुण मिळाल्याचे एका पालकाने सांगितले.
अंतर्गत मूल्यमापनाची पद्धत बोर्डाने ठरवून दिली होती. वास्तविक नववीचा विद्यार्थी दहावीत चांगला अभ्यास करतो. त्यामुळे तो दहावीच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवतो. शिक्षण विभाग, बोर्ड यांनी वारंवार सूचना देऊन, पडताळणी करून शाळांकडून अंतर्गत मूल्यमापन करून घेतले. त्यामुळे त्यात पारदर्शकतादेखील राहिल्याचे काही पालकांनी स्पष्ट केले.