संशयिताच्या शोधासाठी घरोघरी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:29 IST2020-03-21T13:29:04+5:302020-03-21T13:29:35+5:30

शिरपुरात परतणाऱ्यांचा लोंढा वाढला : नागरीकांचा घेणार शोध

A house-to-house survey to find a suspect | संशयिताच्या शोधासाठी घरोघरी सर्वेक्षण

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर राज्यभरातील अनेक नागरीक शिरपुरात परतत आहेत़ विशेषत: पुणे व मुंबईहून परतणाºया नागरीकांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे शिरपूरला परतलेल्या नागरीकांच्या आवश्यक त्या चाचण्यांसाठी आता नगरपालिकामार्फत शहरी भागात तर ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा नागरीकांची माहिती घेतली जाणार असल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी सांगितले़
पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत़ त्यापाठोपाठ मुंबईतही परिस्थिती गंभीर झाली आहे़ शिरपूरमध्येही अनेकजण शिक्षण, रोजगार व इतर कारणांसाठी पुणे-मुंबईला अनेकजण स्थायिक झाले आहेत़ पुण्या-मुंबईत कोरोना रूग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये अनेक सार्वजनिक ठिकाणी बंद करण्यात आली आहेत़
शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसला सुटी देण्यात आली आहे़ त्यामुळे पुण्या-मुंबईतील अनेकांनी शिरपूरकडे परतीची वाट धरली आहे़ त्यामुळे ट्रॅव्हल्स, रेल्वे आदींच्या माध्यमातून अनेकजण शिरपुरात पोहाचले आहेत़ हे सर्व प्रवाशी वेगवेगळ्या मार्गाने, वाहनाने दाखल झाले आहेत़ त्यामुळे अशा कोरोना प्रभावित भागातून परतलेल्या नागरिकांचा शोध घेतला जाणार आहे़
तालुक्यात आजघडीला एकही संशयित अथवा रूग्ण नसला तरीही शेजारील जळगांव जिल्ह्यात संशयित आढळले आहेत़ या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे आवश्यक आहे़ या पार्श्वभूमीवर अशा नागरिकांचा शोध घेवून त्यांना काही लक्षणे आहेत का? याची तपासणी केली जाणार आहे़ यातून कोणीही संशयित रूग्ण उपचाराअभावी राहू नये, त्याचवेळी या संशयितांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होवू नये याची खबरदारी प्रशासन घेत असल्याचे सांगण्यात आले़
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालय वा बँकामध्ये गर्दी होवू नये यासाठी एकावेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे़

Web Title: A house-to-house survey to find a suspect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे