बोराडी येथे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:31+5:302021-09-15T04:41:31+5:30
बोराडी येथे शिक्षक दिनी झालेल्या एका कार्यक्रमात धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात ...

बोराडी येथे राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
बोराडी येथे शिक्षक दिनी झालेल्या एका कार्यक्रमात धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला़ यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे खजिनदार आशाताई रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, विश्वस्त रोहित रंधे, माजी जि.प. सदस्या सीमा रंधे, विद्या रंधे, हर्षाली रंधे, रोहिणी रंधे, संस्थेचे विश्वस्त शामकांत पाटील, डॉ. जितेंद्र चित्ते, एस.पी.डी.एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्ही.एम.पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एस.एम. पटेल, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी. एच.पाटील, प्राचार्य महेश पवार, प्राचार्य डॉ.राजेश गिरी, संस्थेचे व्यवस्थापक ए. ए. पाटील, के.डी. बच्छाव, भैया माळी, सीताराम माळी, प्रा. कल्पेश वाघ, सेवानिवृत्त प्राचार्य बी.डी.पाटील, डी.एड्. कॉलेजच्या प्राचार्य सु.ल.वैद्य, दिलीप पाटील, सी.एम कुलकर्णी, वाय.एल. पाटील, जे.के.सोनवणे आदी उपस्थित होते. कौशल भारत-कुशल भारत व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२१ या विषयावर निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक शिरपूर येथील सावित्रीताई रंधे कन्या विद्यालयातील पर्यवेक्षिका सारिका निशांत रंधे यांनी मिळवला. द्वितीय शिरपूर कन्या विद्यालयाच्या स्मिता कोठारी तर तृतीय क्रमांक एरंडोल येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या सोपान राजेंद्र माळी यांनी मिळविला़
शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली़ त्यात शिक्षकांबद्दल कृतज्ञता या विषयावर स्पर्धेत प्रथम लातूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची माधुरी एस़. शिंदे, द्वितीय क्रमांक बोराडी येथील फार्मसी कॉलेजची सेजल भास्कर पाटील तर, तृतीय क्रमांक लातूर फार्मसी महाविद्यालयातील सबा शेख यांनी मिळविला. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यासाठी प्राचार्य महेश पी.पवार, प्राचार्य डॉ.पी.एच.पाटील, प्रा़ सतीश पाटील, प्रा.कल्पेश वाघ, प्रा़ चंद्रनील ईशी, प्रा.हर्षल मिस्तरी, प्रा.माधवी परदेशी, प्रा.सागर कोळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.