सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST2021-07-05T04:22:45+5:302021-07-05T04:22:45+5:30
खजिनदार गुणवंत देवरे, उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे व प्राचार्य डॉ.हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे सुवर्ण पदक, ...

सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्याचा सत्कार
खजिनदार गुणवंत देवरे, उपाध्यक्ष प्रफुल्ल सिसोदे व प्राचार्य डॉ.हितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे सुवर्ण पदक, गुणवत्ता यादी प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कारार्थी विद्यार्थ्यांमध्ये संगणक शाखेतील मानसी अनिल जाधव, सायली मधुकर चौधरी, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील शेख बुशरा फैज, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग विभागातील भूषण अरुण शिंदे, शुभांगी संजय पाटील, राजश्री भैय्या साहेब भामरे, इलेक्ट्रॉनिक्स टेली कम्युनिकेशन विभागातील प्राजक्ता सुरेश चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष सुभाष देवरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस. के. दुबे, प्रा.भालचंद्र मांडरे, प्रा.प्रकाश बाविस्कर, प्रा.डॉ.पी.एस. पाटील, प्रा.डॉ.एस.डी. सूर्यवंशी, प्रा.डॉ.एस.एन. जैन, प्रा.विनोद शिंदे, रजिस्ट्रार प्रा.कुणाल पाटील, प्रा.मोहन पवार, प्रा.जितेंद्र व्यास, आनंद कुलकर्णी.