जिल्हा परिषदेत आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:14 IST2020-07-17T22:14:23+5:302020-07-17T22:14:55+5:30
कृषी समितीचा पुढाकार : उत्कृष्ट कार्याचा केला गौरव

जिल्हा परिषदेत आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान
धुळे : जिल्ह्यातील प्रगतीशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव जिल्हा परिषदेत शुक्रवारी करण्यात आला़
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, कृषी समिती सभापती रामकृष्ण खलाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी़ एम़ सोनवणे उपस्थित होते़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन व बिरसामुंडा आदिवासी योजनेतंर्गत शेतकºयांनी भविष्यात जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रंधे यांनी आपल्या मनोगतातून केले़ कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी मनोगत व्यक्त केले़ ते म्हणाले, कृषी विभागाच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकºयांना विविध योजनेतून इलेक्ट्रिक पंपसंच, ताडपत्री, पीव्हीसी व एचडीपीएफ पाईप, बॅटरी, चार्जिंग स्पे्र पंप वाटप करण्याचा मानस व्यक्त केला़ यापुढेही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकºयांना लाभ कसा मिळेल याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत करण्यात येईल, असेही खलाणे यांनी सांगितले़
धुळे तालुक्यातील वडजाई येथील शेतकरी गिरीश देवरे यांनी उन्हाळी हंगामात ज्वारी पिकाची लागवड ठिबक सिंचनवर करुन हेक्टरी ७५ क्विंटल उत्पादन घेण्यात आले़ जिल्हा परिषदेच्या सदस्या बेबीबाई कुटवाल पावरा यांनी मत्स्य पालनात व वैयक्तिक शेली पालनाचे कार्य अतिशय उत्कृष्ठपणे कार्य केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला़ तसेच मालपूर येथील शेतकरी हेमराज पाटील यांनी वैयक्तिक स्वत:ची खासगी दूध डेअरीच्या माध्यमातून व स्वत: ५० म्हशी, गार्इंचे संगोपन करत त्यातून २० हजार लिटर दररोज दुधाचे संकलन केले़ त्यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला़