धुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:54 IST2019-08-07T11:54:38+5:302019-08-07T11:54:54+5:30

खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

The honorarium of village employment workers in Dhule district was kept for six months | धुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

धुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांचे मानधन सहा महिन्यांपासून रखडले

आॅनलाइन लोकमत
धुळे : ग्रामरोजगार सेवकांचे मार्च ते आॅगस्ट २०१९ असे एकूण सहा महिन्यांचे मानधन थकले असून, ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सेवक हे अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करतात. त्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करावे लागत असते. ते सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांना दरमहा मानधन न मिळाल्याने आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मानधन मिळत नसल्याने काय करावे हे त्यांना सूचत नाही. वेळेवर मानधन मिळत नसतांनाही ते इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावित आहे.
दरम्यान संबंधितांना मानधन देण्याचे आदेश देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील व इतरांच्या स्वाक्षºया आहेत.

Web Title: The honorarium of village employment workers in Dhule district was kept for six months

टॅग्स :Dhuleधुळे