सरपंच उपसरपंचाना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:34+5:302021-02-16T04:36:34+5:30

धुळे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या. सध्या सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक ...

Honorarium to Sarpanch Deputy Sarpanch, but only tea to the members | सरपंच उपसरपंचाना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

सरपंच उपसरपंचाना मानधन, सदस्यांना मात्र केवळ चहापान

धुळे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक नुकत्याच पार पडल्या. सध्या सरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काही ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक पार पडली. १८ फेब्रुवारीपर्यंत सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. निवडणुकीत अमाप पैसे खर्च करण्यात आले. मात्र निवडून आलेल्या सरपंच-उपसरपंचांना तुटपुंजे मानधन मिळणार आहे तर सदस्यांना केवळ चहापानावर समाधान मानावे लागणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अमाप पैसे वाटल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. मात्र निवडून गेलेल्या सदस्यांना खूप कमी भत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरपंच व उपसरपंचाना ३ हजार ते ५ हजार या दरम्यान मानधन मिळणार आहे. लोकसंख्येनुसार मानधन असेल. २ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचाला ३ हजार रुपये तर उपसरपंचाला १ हजार रुपये मानधन राहील. २ हजार ते ८ हजार इतकी लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचांना ४ हजार व उपपसरपंचाना १ हजार ५०० इतके मानधन आहे. तर ८ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावातील सरपंचाला ५ हजार व उपसरपंचाला २ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तर सदस्यांना २०० ते ३०० रुपये इतका भत्ता मिळणार आहे.

* निवडून आलेल्या सदस्यांना २०० ते ३०० रुपये बैठक भत्ता आणि चहा पाणी एवढ्यावरच समाधान मानावे लागते.

प्रतिक्रिया -

गावाच्या विकासकामात योगदान देता येईल व सामाजिक कार्य करता येईल यासाठी निवडणुकीत भाग घेतला होता. मानधनापेक्षा गावाचे प्रश्न सोडवता येतील याचा आनंद आहे.

- कविता मुजगे, सरपंच, जैताणे

सरपंच व उपसरपंचाना मिळणारे मानधन अतिशय कमी आहे. त्यात वाढ व्हावी. ग्रामपंचायत सदस्यांना मिळणाऱ्या बैठक भत्त्याची रक्कम वाढवून द्यावी. यासोबतच गावाच्या विकासासाठी अधिक निधी देण्याची मागणी करणार आहोत.

- सरपंच

सरपंचांना कमी मानधन मिळते. मात्र मानधनापेक्षा समाजाची सेवा करण्याची संधी मिळते याला महत्त्व देतो. मानधनासोबतच ग्रामपंचायतीला अधिक निधी मिळायला पाहिजे.

- सरपंच

Web Title: Honorarium to Sarpanch Deputy Sarpanch, but only tea to the members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.