भटाणे येथे महिला शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:54 IST2020-03-11T12:54:15+5:302020-03-11T12:54:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तºहाडी : शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त लुपिन फाउंडेशन धुळे तर्फे प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा ...

Honor of women farmers at Bhatane | भटाणे येथे महिला शेतकऱ्यांचा सन्मान

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
तºहाडी : शिरपूर तालुक्यातील भटाणे येथे जागतिक महिला दिनानिमित्त लुपिन फाउंडेशन धुळे तर्फे प्रगतीशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी आर.डी. मोरे, नाबार्ड बँकेचे अधिकारी विवेक पाटील, निलेश पवार, संदीप झनझने यांच्यासह कर्मचारी व महिला शेतकरी उपस्थित होते. लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशन, धुळेतर्फे बीसीआय, जीआयझेड यांच्या संयुक्त विद्यमाने भटाणे येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिरपूर परिसरातील जवखेडा, अर्थे बु., उंटावद, वाघाडी, बलकुवे, विखरण, भटाणे येथील महिला शेतकºयांनी लुपिन ह्युमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येत असलेल्या सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प (बीसीआय) तसेच जीआयझेडतर्फे सुनीताबाई कमलेश पाटील (विखरण), वंदनाबाई ज्ञानेश्वर पाटील (भटाणे), सुरेखाबाई ज्ञानेश्वर पाटील (अर्थेबु.), मनिषाबाई संजय गिरासे (भटाणे) यांना प्रोत्साहनपर शेतकरी सुरक्षा कीट देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी लुपिन फाउंडेशनचे निलेश पवार, संदीप झनझने, व्यवस्थापक दिनेश पाटील, कृषिमित्र देवेंद्र करंके, संदीप पाटील, अक्षय पाटील, सीमा पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Honor of women farmers at Bhatane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे