अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त ३ प्राध्यापकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:44+5:302021-08-17T04:41:44+5:30
शिरपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या शहरातील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांचा ...

अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त ३ प्राध्यापकांचा गौरव
शिरपूर : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या शहरातील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयातील ३ प्राध्यापकांचा गौरव माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.
उमविमध्ये नुकताच विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिन व कार्यगौरव सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ.ई.वायुनंदन, जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, गजलकार कमलाकर देसले या मान्यवरांच्या उपस्थितीत आर.सी.पटेल फार्मसीचे उपप्राचार्य डॉ.अतुल अरुण शिरखेडकर यांना सन २०१८-२०१९ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, डॉ. हितेंद्र शालीग्राम महाजन यांना सन २०१७-२०१८ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार तर डॉ.हारूण एम. पटेल यांना सन २०१७-२०१८ चा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बहाल करण्यात आला. या सर्व पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा महाविद्यालयात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, पुरस्कार प्राप्त उपप्राचार्य डॉ. अतुल अरुण शिरखेडकर, डॉ. हितेंद्र शालीग्राम महाजन, डॉ. हारूण पटेल उपस्थित होते.
डॉ.अतुल शिरखेडकर हे उपप्राचार्य, विभागप्रमुख (फार्मास्युटिकल केमिस्ट्री) आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही उत्कृष्ट संशोधनाबद्दल विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. १५० हून अधिक शोधनिबंध उच्च दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संशोधन सेमिनार आणि कार्यशाळेत ते परीक्षक असतात. उमवि येथे अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. विविध शैक्षणिक समित्यांचे सदस्य असून काही शैक्षणिक समित्यांचे प्रमुख म्हणून कार्य पाहतात.
डॉ. हितेंद्र शालीग्राम महाजन यांनी विविध संस्थांकडून तब्बल १ कोटी २२ लाख एवढे संशोधन अनुदान प्राप्त झाले आहे. यापूर्वी उत्कृष्ट संशोधनाबद्दल विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे. असोसिएशन ऑफ फार्मसी टीचर इन इंडिया तर्फे कॉन्व्हेंशन २०१९ साठी डेहराडून इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी उत्तरांचल येथे प्रोफेसर अंबिकानंदन मिश्रा रिसर्च एक्सलेन्स अवॉर्ड इन फार्मास्युटिक्स अँड ड्रग डिलेव्हरी पुरस्कार देण्यात आला होता. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, यांच्याकडून गांधीयन युवा संशोधन पुरस्कार, सोसायटी फॉर रिसर्च अँड इनिशिएटिव्हज फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजीज अँड इन्स्टिट्यूशन्स आणि बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कडून संशोधन पुरस्कार प्राप्त झाला आहे. उमवि अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत़
डॉ.हरूण पटेल यांनी उमवि येथून बी.फार्ममध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. जामिया हमदर्द नवी दिल्ली येथून एम.फार्ममध्ये सुवर्ण पदकाचे मानकरी, पंजाब विद्यापीठ चंदीगड येथून पीएच.डी. केली आहे. फुप्फुसाचा कर्करोग या विषयावर संशोधन केले.