धुळ्यात डॉक्टरांसह १५० कोरोना योध्द्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:09 IST2020-06-25T21:09:14+5:302020-06-25T21:09:34+5:30

वैद्यकीय सेवा : जागतिक आरोग्य संघटनेचे पदाधिकारी डॉ़ वानखेडकर यांचा उपक्रम

Honor of 150 Corona warriors with doctors in Dhule | धुळ्यात डॉक्टरांसह १५० कोरोना योध्द्यांचा गौरव

dhule

धुळे : कोरोना रुग्णांवर उपचार आणि प्रत्यक्ष देखरेख करणाऱ्या धुळ्यातील १५० कोरोना योध्द्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़
जागतिक आरोग्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ़ रवी वानखेडकर यांनी कोरोनाशी लढणाºया डॉक्टर, नर्स आणि कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला़ १५० पेक्ष अधिक महिला, पुरूष कोरोना योध्द्यांना जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते सन्मानपत्र, गिफ्ट आणि पौष्टीक फळे देवून गौरविण्यात आले़ जिल्हाधिकाºयांनी या उपक्रमाचे कौतुक केले़
साक्री रोडवरील जिल्हा रूग्णालयात मंगळवारी दुपारी साडेचारला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, कोविड नोडल आॅफिसर व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्यासह ३५ हून अधिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचा जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते गौरव झाला. नंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयातही अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, कोविड नोडल आॅफिसर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांच्यासह ११५ हून अधिक वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचा जिल्हाधिकाºयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ यावेळी डॉ. रवी वानखेडकर उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हाधिकाºयांनी सांगितले, डॉ. रवी वानखेडकर यांनी राबविलेला उपक्रम भावला असून तो प्रशंसनीय आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात अहोरात्र जीवाची पर्वा न करता लढणाºया वैद्यकीय सेवेतील कोरोना योध्द्यांचा गौरव होणे म्हणजे या उपक्रमाचे ते सार्थक आहे. समाजासाठी अनुकरणीय असा हा बांधिलकीचा उदात्त उपक्रम आहे. त्यासाठी डॉ. रवी वानखेडकर यांनी घेतलेला पुढाकार आणि जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते गौरव झाल्याने उपस्थित सर्व कोरोना योद्धा भारावले.
डॉ. रवी वानखेडकर यांच्या मातोश्री भागीरथीबाई सीताराम वानखेडकर यांचा ९० वा वाढदिवस मंगळवारी साजरा झाला. यानिमित्त डॉ. रवी वानखेडकर यांनी अनोखी संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न सर्वोपचार रूग्णालय, साक्री रोडवरील जिल्हा रूग्णालय येथील अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकाºयांपासून स्वच्छता, सुरक्षा कर्मचाºयांपर्यंतच्या घटकांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला.
डॉ़ वानखेडकर यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाºया या उपक्रमाचे धुळे शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे़

 

Web Title: Honor of 150 Corona warriors with doctors in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे