धुळे मनपा आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

By Admin | Updated: May 4, 2017 16:01 IST2017-05-04T16:01:26+5:302017-05-04T16:01:26+5:30

करवसुलीत उच्चांक गाठल्याने मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांचा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Hon'ble Municipal Commissioner, Hon'ble Chief Minister | धुळे मनपा आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

धुळे मनपा आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 धुळे, दि.4 - मनपाच्या करवसुलीत उच्चांक गाठल्याने मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांचा गुरुवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धुळे, अकोला व पुणे महापालिकांनी चांगली करवसुली केल्याने तिन्ही महानगरपालिका आयुक्तांचा सत्कार करण्यात आला. धुळे महापालिकेने यंदा प्रथमच 92 टक्के करवसुली केली. यावेळी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलींद म्हैसकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
 
 

Web Title: Hon'ble Municipal Commissioner, Hon'ble Chief Minister