मुक्त योजनेतून घरकूलाचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:49 PM2020-01-19T22:49:42+5:302020-01-19T22:49:56+5:30

देविदास नांदगावकर : स्वत:ची जागा असलेल्यांना मिळेल दिलासा

 Homeowners should benefit from a free plan | मुक्त योजनेतून घरकूलाचा लाभ घ्यावा

Dhule

googlenewsNext

धुळे : ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवगार्तील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत वैयक्तिक घरकूल बांधकामसाठी मान्यता दिलेली आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेसाठी लाभार्थ्यांनी अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत अर्ज सादर करावा.
अटी व शर्ती अशा : ही योजना विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या सवर्ग प्रवगार्साठी लागू राहील. तसेच हा लाभार्थी गावोगावी भटकंती करून उपजिविका करणारा असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थी बेघर अथवा झोपडी, कच्चे घर, पालामध्ये राहणारा असावा. तो राज्याचा अधिवासी असावा. तो भूमीहिन असावा, लाभाथ्यार्ने महाराष्ट्रात कुठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्याने वर्षभरात सहा महिने एकाच ठिकाणी वास्तव्य करावे. ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी असेल. वैयक्तिक लाभाथ्यार्ला देखील रमाई आवास घरकुल योजनेच्या धर्तीवर घेता येईल. या योजनेसाठी एकूण १० पात्र लाभार्थी कुटुंबांसाठी जागा मिळत असल्यास लाभ देण्यात येणार आहे. एकूण २० कुटुंबांसाठी पूर्वी एक हेक्टर जमीन उपलब्ध नसल्यास ही अट शिथील करण्याचे अधिकार समितीला राहतील. ज्या वैयक्तिक लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतलेला नाही त्याला या योजनेचा लाभ घेता येईल. असे आवाहन नांदगावकर यांनी केले आहे़

Web Title:  Homeowners should benefit from a free plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे