मालपूर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:46 IST2019-07-25T22:46:43+5:302019-07-25T22:46:58+5:30
पुण्यतिथी : सावता महाराज व नामदेव महाराज

मालपूर येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत सावता महाराज व संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिाम कीर्तन सप्ताह तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात झाली असून यानिमित्ताने गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात संतांची पालखी काढण्यात आली. यानिमित्त १ आॅगस्ट रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ वर्षापासून मालपूर येथे या कीर्तन सप्ताहाचे व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील सोहळा सुरू झाला असून दररोज रात्री ९ ते ११ महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम असे पहाटे ४ ते ५ काकडा आरती, ८ ते ११ व २ ते ४ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, आरती, गीतापाठ व रोज रात्री ९ ते ११ हरि कीर्तन. यात हभप योगीराज महाराज वरझडी, हभप ब्रम्हमुर्ती परमेश्वरजी महाराज सुरायकर, हभप गोपाल महाराज सांजोरीकर, हभप अतुलजी महाराज नारनेरकर, हभप दिनेश महाराज कंचनपूर, हभप राजुजी महाराज कासोदा, शिवाजी महाराज शेगांव यांचे कीर्तन होत आहे. १ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वाजता शिवाजी महाराज शेगांव यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हभप बापु महाराज मालपुरकर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.