दुसया दिवशी जवखेडा परिसरात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 08:45 PM2019-06-26T20:45:11+5:302019-06-26T20:46:55+5:30

शिरपूर : जुने भामपूर येथे नाल्याला आलेल्या पूरामुळे ८ जनावरे वाहून गेलेत, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

High day in Jakhkheda area | दुसया दिवशी जवखेडा परिसरात अतिवृष्टी

शिरपूर तालुक्यातील भामपूर येथे सलग दुसया दिवशी झालेल्या पावसाने घरांची झालेली पडझड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर / शिंदखेडा:  तालुक्यात दुसºया दिवशीही सोमवारी रात्री  जवखेडा मंडळात अतिवृष्टी झाली़ नवे भामपूर येथे पुरामुळे शेतीचे नुकसान झाले़ तर  पूरात ८ जनावरे वाहून गेली आहे़ शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न. येथे पावसामुळे नाल्याला पूर आल्याने बांधण्यात आलेली मोरी व रस्ता वाहून गेला.
शिरपूर तालुक्यात सोमवारी रात्री साडे बारा ते तीन वाजेदरम्यान जुने भामपूर, जळोद व उखळवाडी परिसरात जोरदार  पाऊस झाला. पावसामुळे  जुने भामपूर गावाला लागून असलेल्या पांढरीचा नाल्याला पूर आले़  पुराचे पाणी हे परिसरातील शेतकºयांच्या शेतात शिरले. त्यामुळे बहुतांशी शेतकºयांच्या शेताच्या  खळ्यात  ठेवलेला जनावरांचा चारा, शेती उपयोगी औजारे व गुरे वाहून गेलीत़ 
या पुरात गावातील गोपीचंद चिंत्तामण पाटील यांच्या २ म्हैशी व शेती उपयोगी साहित्य वाहून गेले़ साहेबराव चैत्राम पवार यांचे २ बैल, प्रकाश मोरचंद पवार यांचा १ बैल तर विठ्ठल भरवाड यांची १ गाय व २ पारडे वाहून गेलीत़ संतोष चैत्राम पाटील व नंदु भिला कोळी यांचे शेतीचे अवजारे व चारा वाहून गेला़ तसेच भामपूर परिसरातील सुमारे २० ते २५ घरांची पडझड झाली. नुकसानीचे पंचनामे तलाठी गुरुदास सोनवणे यांनी केली. त्यात गुराचे ३ लाख ८० तर  घराच्या पडझडीमुळे तीन लाखांचे नुकसान असे एकूण  ६ लाख ८० हजारांचे नुकसान झाले आहे़  

* बैलजोड्या, अवजारे वाहून गेली 
वाघाडी ते विखरण परिसरात शेती पाण्याखाली आली असून नाले भरून वाहत आहेत. उखळवाडी आणि मुखेड या दोन लघु प्रकल्पामधून निघणारे नाले भामपूरजवळ एकत्र येतात. मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टीमुळे नाल्यात पाण्याचा लोंढा तयार झाला.  यापूर्वी २३ जूनला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांना ही घटना घडली. बैलजोड्या, शेती अवजारे वाहून गेल्याने पेरणी कशी करावी असा प्रश्न या नुकसानग्रस्त शेतकºयांसमोर उभा राहिला आहे.

*१९ वर्षा पहिल्यांदा पाऊस 
२३ रोजी झालेल्या पावसामुळे अर्थे येथील जि़प़शाळेचा पत्र उडून मोठे नुकसान झाले  तर सुभाषनगर येथे देखील २ घरांचे पत्रे उडून गेले आहेत. गेल्या १९ वर्षात आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस सन २०१३ मध्ये १४८० मिमि तर सर्वात कमी पाऊस सन २०१२ मध्ये ४२१ मिमि पाऊस झाला होता़
 गतवर्षी सरासरीच्या ८६़४० टक्के इतकाच पाऊस झाला होता़ मात्र गतवर्षी झालेल्या पावसामुळे नदी-नाले देखील वाहते झालेले नव्हते़  त्यामुळे मार्चपावेतो निम्मेच्यावर लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट झालेला होता़ करवंद मध्यम प्रकल्प देखील भरला नव्हता, त्यामुळे तो ही कोरडाच झाले  आहे़.तालुक्यात सतत दोन दिवसापासून अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे शेती व घरांची पडझड झाली आहे. सलग दुसºयादिवशीही  स् अतिवृष्टी झाल्यामुळे शिरपूर पॅटर्न अंतर्गत बांधण्यात आलेले कुवे, अर्थे, निमझरी, मांजरोद, जापोरा परिसरातील बंधाºयात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले      आहे़  याबाबत शेतकरी आनंदीत आहे. 

*दलवाडे येथील रस्ता व मोरी वाहून गेला
विरदेल व दलवाडे प्ऱन गावाचा एक किमी रस्त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फेत २० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता़ या रस्तयावरील पाईप मोरी पहिल्याच पावसात वाहून गेल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़  दलवाडे येथील ग्रामस्थांनी पाईपमोरी ऐवजी छोटा पूलाची मागणी केली होती़ त्यासाठी या बांधकामासाठी विरोध देखील झाला होता़ मात्र जि़प़च्या अधिकारी व ठेकेदारांनी मनमानी करत ग्रामस्थांना विरोध पत्करत बांधकाम केले होते़  पहिल्या पावसात प्रमाणापेक्षा जास्त पाणी आल्याने पाईपासह मोरी पाण्यात वाहून गेला़ त्यामुळे  शासनासह जवळच्या शेतकºयांच्या शेतात पाणी जावून नुकसान झाले आहे़ दरम्यान दोन्ही गावांना जोळणार नाला तुटल्याने नागरिंकांना संपर्क तुटल्याने  दोंडाईचा व शिंदखेडा येथून येणारी वाहतूक ही चिमठाणे व जोगशेलू मार्गे वळविण्यात आली होती़ त्यानंतर हा मार्ग  दुरुस्ती करून दुपारी सुरू करण्यात आला़ ाासनाचे व शेतकºयांचे नुकसानीस कारणीभूत असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे़

*देवपूरात पाऊस अन धुळे शहरासह मील परिसर कोरडाच !

 धुळ्यात मंगळवारी दुपारी साडे चार ते पाच वाजेदरम्यान देवपुरात दत्त मंदिर चौक परिसर आणि नकाणे व वाडीभोकर रोड परिसरात जोरदार पाऊस झाला. मात्र याचवेळी धुळे शहर आणि साक्रीरोड व मिल परिसरात पाऊस झाला नाही. त्यामुळे देवपूर परिसरातून येणाºया नागरिकांना आश्चर्य वाटत होते. धुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया नकाणे तलावातील जलसाठा कमी झाला आहे. त्यामुळे हरण्यामाळ धरणातून चारीद्वारे पाणी आणून नकाणे तलाव भरला जात आहे. शिरपूर तालुक्यासह शिंदखेडा व साक्री तालुक्यात दोन दिवसापासुन पावसाने हजेरी लावली आहे़ यात सर्वाधिक पाऊस शिरपूर तालुक्यात झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे़ तर शिंदखेडा व साक्री तालुक्यातील शेतकºयांना अद्याप जोरदार पावसाची प्रतिक्षा लागुन आहे़ त्यामुळे काही शेतकºयांनी पहिल्या पावसात पेरण्यात केल्या आहेत तर अद्याप काही पावसाची वाट पाहत आहे़ जिल्ह्यात मंगळवारी  २५ रोजी झालेला पाऊस धुळे तालुक्यात १३२.२, साक्री १०२ शिरपूर ११८, शिंदखेडा ११३ मि़मी़ झाला होता़

 

Web Title: High day in Jakhkheda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे