कोरोनात मृत झालेल्या सभासद डॉक्टरांच्या कुटुंबींयाना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:37+5:302021-06-10T04:24:37+5:30

जिल्ह्यातील ४ ते ५ डॉक्टरांचा समावेश आहे. दुर्दैवाने शासनाकडून मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळालेली नसल्याने आय.एम.ए. मार्फत अशा ...

A helping hand to the families of the member doctors who died in Corona | कोरोनात मृत झालेल्या सभासद डॉक्टरांच्या कुटुंबींयाना मदतीचा हात

कोरोनात मृत झालेल्या सभासद डॉक्टरांच्या कुटुंबींयाना मदतीचा हात

जिल्ह्यातील ४ ते ५ डॉक्टरांचा समावेश आहे. दुर्दैवाने शासनाकडून मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांना कुठलीही मदत मिळालेली नसल्याने आय.एम.ए. मार्फत अशा कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जात आहे.

शहराचे सेवाभावी सिनिअर ‍फिजिशियन डॉ. चुडामण पाटील, आणि डॉ. शिवराज निकुंभ यांचा कोरोनात मृत्यू झाला आहे. अशा संकट काळात मयत कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (हेडक्वार्टर) प्रत्येक कुटुंबाला १० लाखांच्या मदतीचा धनादेश जागतिक आरोग्य संघटना अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, आयएमआयचे राष्ट्रीय सचिव डॉ. जयेश लेले, डॉ. राधेश्याम रोडा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी आय.एम.ए. धुळेचे कार्याध्यक्ष डॉ. जयंत देवरे, ‍सचिव डॉ. दीपक शेजवळ, माजी अध्यक्ष डॉ. जया दिघे, माजी अध्यक्ष डॉ. मीना वानखेडकर, माजी सचिव डॉ. महेश आहिरराव, खजिनदार डॉ. सचिन ढोले, कुटुंबीयांतर्फे डॉ. उषा पाटील, उषा निकुंभ डॉ. अनुषा निकुंभ,डॉ. सौरभ निकुंभ उपस्थित होते. आय.एम.ए. धुळे शाखा ही राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयलाल व महासचिव डॉ. जयेश लेले यांची आभारी आहे.

Web Title: A helping hand to the families of the member doctors who died in Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.