धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:53 IST2019-11-10T20:53:30+5:302019-11-10T20:53:46+5:30
महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या
आॅनलाइन लोकमत
धुळे : गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे पंचनाम्यांच्या चक्रात न अडकता शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्यात पंचनाम्याच्या चक्रात न अडकता, शेतकºयांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत तत्काळ देण्यात यावी, फळबागायतदार शेतकºयांना हेक्टरी ३ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, गतवर्षाचे दुष्काळ अनुदान तत्काळ देण्यात यावे, त्याचप्रमाणे गेल्यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अनेक ठिकाणी शेतकºयांना खरीप व रब्बी पीक योजनेचा लाभ मिळाला नाही. तो लाभ लवकरात लवकर देण्यात यावा. तसेच यावर्र्षीचाही पिक विमा लवकर देण्यात यावा. शेतकºयांचे वीज बिल माफ करण्यात यावे, शेतकºयांना रब्बीच्या पेरणीसाठी बियाणे देण्यात यावे, पुरग्रस्त शेतकºयांना जाहीर केलली मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
निवेदनावर प्रदेश नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, अॅड. दुष्यंतराजे देशमुख, प्रदेश प्रभारी रावसाहेब कदम, अजित राजपूत, संदीप जडे, कन्हैय्या चौधरी, राकेश तिवारी, मदन पाटील, यांच्यासह अनेकांची नावे आहेत.