दोन महिन्यानंतर पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:02 PM2020-08-05T15:02:10+5:302020-08-05T15:02:19+5:30

दुसाणे : पिकांना जीवदान, दुबार पेरणीचे संकट तूर्त टळले, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त

Heavy rains after two months | दोन महिन्यानंतर पावसाची दमदार हजेरी

दोन महिन्यानंतर पावसाची दमदार हजेरी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
दुसाणे : साक्री तालुक्यातील दुसाणे गावासह संपूर्ण माळमाथा परिसरात मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
कांदे लागवड व पेरणी होऊन दोन महिने उलटले. मात्र, पावसाचा एकही थेंब पडला नाही. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. काही शेतकºयांवर दुबार पेरणी करण्याची वेळ देखील आली होती. पिकांना तीव्र उन्हाचा तडाखा बसत असल्याने पिके कोमेजून जात होती. तापमान वाढल्यामुळे विहिरींची पाणी पातळी देखील खोलवर गेली होती. अशा परिस्थितीत शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावरच आपली पिके वाचविण्याचा खटाटोप सुरु ठेवला होता. दमदार पाऊस नसल्याने पिकांवर इतर रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढत होता. शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करुन हैराण झाले होते.
४ आॅगस्ट रोजी संपूर्ण परिसरात सुमारे दीड तास पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नदी-नाले भरून निघाले. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकट तूर्त तरी टळले आहे. या पावसामुळे शेतकरी व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत होते.

Web Title: Heavy rains after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.