आरोग्य सेविका आशा शिंदे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:17+5:302021-09-05T04:40:17+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोराडी ग्राम परिषदेच्या सरपंच सुरेखाबाई पावरा होत्या. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल ...

आरोग्य सेविका आशा शिंदे यांचा सत्कार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोराडी ग्राम परिषदेच्या सरपंच सुरेखाबाई पावरा होत्या. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा बोराडी ग्राम परिषदेचे उपसरपंच राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्या जताबाई पावरा, ग्रामविकास अधिकारी डी. आर. पेंढारकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निलिमा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रमण पावरा, पंतसंस्थेचे चेअरमन शंशाक रंधे, पोलीस पाटील अनिल पावरा, वसंत पावरा, हरी पावरा, भागवत पवार व ग्राम परिषदेचे सदस्य संजय पाटील, चंद्रसिंग पवार, सुखदेव भिल, जिजाबराव पाटील, अर्जुन भिल, विजय सत्तेचा, डोंगरसिंग पावरा, मनुबाई भिल, कंचनबाई पावरा, भावना पाटील, छायाबाई बडगुजर, उज्जैनबाई भील, उर्मिलाबाई पावरा, प्रमिलाबाई पावरा, रेखाबाई पाटील लिपिक उमेश पावरा, संगणक सहाय्यक राकेश पावरा, विजय पावरा, भुऱ्या पावरा आदी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका आशा शिंदे यांनी सहा वर्षांत आदिवासी भागात चांगले काम केले. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवेला प्राधान्य दिले. गेल्या महिन्यात आशा शिंदे यांची वाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली आहे. त्यामुळे त्यांचा बोराडी ग्राम परिषदेच्यावतीने सत्कार करून गौरविण्यात आले.