इनरव्हील क्लबतर्फे आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:43 IST2019-07-31T11:43:14+5:302019-07-31T11:43:34+5:30
दोंडाईचा : अक्कलकोस आश्रमशाळेत उपक्रम, गणवेश व शालेय साहित्य वाटप

अक्कलकोस आश्रमशाळेत सर्वरोग निदान तपासणी शिबिरप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत डॉक्टर्स, इनरव्हील क्लब पदाधिकारी व सदस्या.
दोंडाईचा : येथील इनरव्हील क्लबच्यावतीने अक्कलकोस येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी २०० मुले व १०० मुली अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शिबिरात मोफत औषध देण्यात आली. विद्यार्थिनींना वैयक्तिक मार्गदर्शन, तसेच वैयक्तिक स्वच्छता व आहार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ.मंजुलता अग्रवाल, डॉ ज्योत्स्ना टोणगावकर, डॉ.वैशाली आडगाळे यांनी वयात येताना होणारे बदल, वैयक्तिक स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.अर्चना पाटील, डॉ.स्वाती सोनवणे, डॉ.दीपाली नागरे यांनी ुुविद्यार्थ्यांची तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच औषधे दिली. डॉ.मानसी बच्छव, डॉ.ललिता आडगाळे, डॉ.पुनम दुग्गड यांनीही आरोग्य तपासणी केली.
डॉ.स्मितल गोस्वामी, डॉ.युतीका भामरे यांनी मौखिक आरोग्याची तपासणी केली. याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, स्कूल बॅग व गणवेश वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अध्यक्ष सारिका इंदाणी, सचिव अनिता निकम, डॉ.मंजुलता अग्रवाल, डॉ.ज्योत्स्ना टोणगावकर, डॉ.अर्चना पाटील, डॉ.स्वाती सोनवणे, डॉ.युतिका भामरे, डॉ.दीपाली नागरे, डॉ.ललिता आडगाळे, डॉ.वैशाली आडगाळे, डॉ.पुनम दूग्गड, डॉ.स्मितल गोस्वामी, डॉ.मानसी बच्छाव, मुनिरा विरदेलवाला, लक्ष्मी शर्मा यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी अक्कलकोस सरपंच ठाणसिंग सोनवणे, हिलाल मालचे, मुख्याध्यापक बी.एस. पाटील, व्ही.टी. गोराणे आदी उपस्थित होते.