धुळे : स्वच्छता अभियानात महत्वाची जबाबदारी सांभाळणाºया मनपाच्या ५०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची सोमवारी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली़ यावेळी डॉक्टरांनी कर्मचाºयांना आरोग्याची काळजी कशा पध्दतीने घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले़शहरातील जेष्ठ नागरिक संघात महापालिका सफाई कर्मचाºयांसाठी राष्ट्रीय सफाई कामगार वित्त व विकास कॉपरिशन नवी दिल्ली तसेच अखिल भारतीय सफाई कर्मचारी मजदूर संघामार्फेत मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात आले़ यावेळी दिल्ली येथील संस्थेचे अमित वाल्मिकी, रतन बीवाल, काशिनाथ मोरे, प्रतिक बीवाल, विक्रम लोट, मयूर गोयल, विक्रम लोट, सुरेश कढरे आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ मोफत रोगनिदान शिबीरात नेत्र तपासणी, कान, नाक, घसा, एचबी तपासणी आदी आजारांची तपासणी करण्यात आली़ शिबीरात सुमारे पाचशे महिला व पुरूष कर्मचाºयांची तपासणी डॉक्टरांनी केली़कर्मचाºयांनी शहराची स्वच्छतेसह आपली देखील आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे़ प्रभागात स्वच्छता करतांना विशेष काळजी घ्यावी़ स्वच्छता झाल्यानंतर घरातील कामांना सुरूवात करावी़ आपण घेतलेल्या काळजीवर आपल्या कुटंूबाची काळजी अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ यावेळी उपस्थित सफाई कर्मचाºयांना डॉक्टरांनी आरोग्य विषयक सल्ला दिला़
पाचशे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 21:36 IST