दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आलिंम्को शिबिरात २४८ जणांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:17+5:302021-08-28T04:40:17+5:30
धुळे समग्र शिक्षा मनपा शिक्षण मंडळ धुळे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे मनपा ...

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आलिंम्को शिबिरात २४८ जणांची आरोग्य तपासणी
धुळे समग्र शिक्षा मनपा शिक्षण मंडळ धुळे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे मनपा कार्यक्षेत्रातील विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यांसाठी मोफत साहित्य, साधने लाभ मिळण्यासाठी मोजमाप शिबिर घेण्यात आले. या शिबिरात २४८ दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपसणी करण्यात आली.
मनपा शाळा क्रमांक ३ मध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आयुक्त अजीज शेख, उपायुक्त गणेश गिरी, प्राचार्य प्रतिभा भावसार, डायटचे प्रशासन अधिकारी महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष घेण्यात आले. या शिबिरात कर्णबधिर, मतिमंद, बहुविकलांग, सेरेबल पाल्सी, अस्थिव्यंग मुलांची तपासणी अलिम्को संस्थेचे तज्ज्ञांकडून झाली. यात पात्र विद्यार्थ्यांना सी पी चेअर, कॅलिपर, कुबड्या, क्रेचेस, ट्रायसिकल,व्हील चेयर, कर्णयंत्र आदी साहित्य देण्यात येणार आहे.
शिबिरात डॉ. दीपक कुमार, रवी कुमार, सुधीर कुमार श्याम ललित यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी केली. जिल्हा रुग्णालय येथील डॉ. सोपान पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिराचे नियोजन एजाज खान पठाण समन्वयक यांनी केले तर शिबिर यशस्वीतेसाठी विषयतज्ज्ञ व विशेष शिक्षक, मुख्याध्यापिका विद्या मोरे यांनी सहकार्य केले.