कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 21:37 IST2019-11-09T21:35:54+5:302019-11-09T21:37:33+5:30
उशिराने कामावर पोहचतात कर्मचारी । दवाखान्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

कापडणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवेचा फज्जा
कापडणे : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला असून गैरहजर कर्मचाऱ्यांच्या रजेच्या अर्जावर रजा मंजूर म्हणून मुख्य डॉक्टरांची स्वाक्षरी नसणे, कर्मचारी बºयाच उशिराने कामावर पोहोचतात, रुग्णांच्या खाटाजवळ इलेक्ट्रिक साहित्यांचा खच पडलेला असतो. अशा विविध समस्यांमध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अडकले आहे.
आरोग्य केंद्रास सकाळी नऊ वाजता आरोग्य केंद्रात भेट दिली असता त्यावेळेनंतर साडेनऊ वाजेपर्यंत अनेक कर्मचारी वेळेवर पोहोचलेले नव्हते. दवाखान्यातील आंतररुग्ण विभागात संततीचे आॅपरेशन झालेल्या महिला रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी तक्रारींचा पाढा वाचला.
दवाखान्यातील अत्यंत किंमती सौर ऊर्जा पॅनलवरती अस्ताव्यस्त खराटे ठेवलेले होत. आंतररुग्ण विभागासमोरील स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ दिसून आले. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारीही केल्या.
येथील बाथरूममध्ये वृक्ष ठेवण्यात आले आहेत. रुग्णांच्या पलंगावर अस्ताव्यस्त पडलेले कपडे व दवाखान्यात कोठेहीही अस्ताव्यस्त ठेवलेले मोठ्या स्वरूपाचे इलेक्ट्रिक वस्तू फिटिंगच्या पट्ट्या अत्यंत बेसिस्तपणे ठेवलेल्या होत्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य दवाखान्यात दिसून येत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात अनावश्यक फेकलेला फलक पडून होता. अधिकाºयांच्या खुर्च्यांचे कव्हर फाटलेले आहे.
शस्त्रक्रिया गृहाच्या मागील बाजूस प्रचंड घाणीचे व अस्वच्छतेचे वातावरण तसेच या दालनाच्या मागील बाजूचे बांधकाम जीर्ण व तुटलेले आहे. येथीलच रिकाम्या पडलेल्या हौदात दवाखान्यातील अनावश्यक फेकलेले साहित्य व केअर कचरा पडलेला आहे. दवाखान्यातील आस्थापना प्रशासन विभाग बंद आहे. प्रयोगशाळेचे दालन सकाळी साडेनऊ वाजता उशीरा येणाºया कर्मचाºयाने उघडले. हिरकणी कक्ष व इंजेक्शन रूमजवळ अत्यंत अस्वच्छ स्वरूपाचे व कुलर ठेवलेले होते. आंतररुग्ण विभागासमोर पत्र्याच्या छताला मोठ्या स्वरूपात जळमटे लागलेले आहे.
एकच डॉक्टर असल्यामुळे रुग्णांचे अक्षरश: तपासणीसाठी रांगा लागतात. प्रतिनिधीने डॉक्टर लोहार यांना माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, दवाखान्यात मस्टर वरती एकूण १७ कर्मचारी आहेत पैकी पाच कर्मचारी अनुपस्थित होते. मुख्य वैद्यकीय अधिकारी विजयंता नागे या नाशिकला ट्रेनिंगला गेले आहेत व बायोमेट्रिक प्रणाली कर्मचाºयांची थम हजेरी प्रक्रिया बंद असून दवाखान्यातील काही महत्त्वाचे औषधेही संपली आहेत, अशी माहिती डॉक्टर लोहार यांनी दिली आहे.